४५. पंढरीच्या पांडुरंगा

पंढरीच्या पांडुरंगा लवकरी धाव रे
दूर राहे तीर आता भोवऱ्यात नाव रे...

पापाच्या रचिल्या राशी
असंगाशी संग रे,
सत्कर्म नाही घडले
कुकर्मात दंग रे
चुकूनही नाही आले मुखी तुझे नाव रे
दूर राहे तीर आता, तूच देई ठाव रे...

ऐलतीर दूर राहे
पैलतीर दूर रे,
मध्यावरी नाव आता
सुटे माझा धीर रे
अगतिक मन माझे आणि वाहे नीर रे
तुजविण देवा आता कोण दावी तीर रे?...

दिन गेले, मास गेले
वर्ष गेले युग रे,
पुरे पुरे म्हणताही
सरले ना भोग रे
जीवनाची आस वेडी, नको धरू राग रे
निशीदिनी आळवितो मुखी तुझे नाव रे...

१६.७.१९७८
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
४५. पंढरीच्या पांडुरंगा | सृष्टीचे हे रूप आगळे