१०. लज्जेचा दागिना

लाजू नको तू अशी, साजणी
लाजू नको तू अशी,
त्या लाजेने लाजुन जाईल तुझ्या मनातिल खुषी...

नेत्र तुझे मज गूज सांगती
प्रीतीची ही रीत निराळी
गालावरती छटा गुलाबी
हळुच उमलते अधरपाकळी
पाकळीतला गंध सेवता उडून जाईल निशी...

वसंत बहरे उभ्या जीवनी
नभांगणी बघ फुले चांदणे
धुंद मना बेबंद करितसे
रंग गंध हा तुझा केतकी
अशा बनाची वाट अनोखी करिते वेडीपिशी...

ढगाआड ग चंद्रही लपला
प्रतिक्षेतला काळ संपला
संघी नामी अशी येतसे
बंधमुक्त हा जीव होतसे
लज्जेच्या मग लाटा फुटती, सौख्याच्या राशी...

रूपगर्विता भाग्यवती तू
मुलखाची ग लाजवंती तू
मनोमनी तू लाजलाजशी
लज्जेचा हा असा दागिना जगात तू मिरविशी...

नोव्हेंबर १९७५
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
१०. लज्जेचा दागिना | भाव मनीचे उमलत राहो