१८. कविता स्फुरते कशी?
सांगू कसे कुणाला?
कविता स्फुरते कशी?
पहाटवेळी वेलीवरती
कळी उमलते जशी
सांगू कसे कुणाला?
कविता होते कशी?
आम्रतरूवर मस्त कोकिळा
कुहुकुहू करते जशी!
सांगू कसे कुणाला?
कविता येते कशी?
वर्षाकाळी नभी प्रकटते
इंद्रधनू की जसे!
सांगू कसे कुणाला?
कविता सुचते कशी?
पहाटवेळी नभी उगवते
शुक्रतारका जशी!
गोडगोजिऱ्या गाली अवचित्
खळी उमते जशी !
धकाधकीच्या अशा जीवनी
कविता फुलते अशी...
१९९९