२. मोरपिसाचा रंग कसा!
तो- सांग साजणी सांग मला ग
सांग साजणी सांग
मोरपिसाचा रंग कसा?...
ती- कुणा भासतो गर्द जांभळा
कुणा वाटतो हिरवा-मरवा
फिरत्या रंगा पाहुनी माझा जीव जाहला कसा खुळा!
सांग साजणा सांग...
तो- सांग साजणी सांग मला ग
सांग साजणी सांग
कुणा भासतो गर्द निळा अन्
मध्येच झळके सोनसळा
चमचमणाऱ्या सोनसळीचा मला लागला कसा लळा
सांग साजणी सांग...
ती- सांग साजणा सांग मला रे
सांग साजणा सांग
मोरपिसाचे वेड जिवाला
मला लागले असे कसे?
डोळियाचे तेज तयांचे मला लाविते वेड कसे?
सांग साजणा सांग...
तो- ऐक साजणी ऐक जरा ग
ऐक साजणी ऐक,
दोन मनांच्या भावुकतेच्या
धुंद प्रीतीचा रंग जसा, इंद्रधनुचा भास जसा
ऐक साजणी ऐक जरा!...
ती- सांग साजणा सांग मला रे...
तो - ऐक साजणी ऐक जरा ग...!
२५.७.१९८४