२३. चैत्रामधली भर दुपार

चैत्रामधली भर दुपार
उदास उदास वाटे फार
मनास का कुणास ठाऊक?
आपला आपणांस होतो भार

चैत्रामधली भर दुपार
घराघराचे बंद दार,
सारे शून्यच हो व्यवहार
नीरवता पसरे ती अनिवार

चैत्रामधली भर दुपार
शांत शांत थोडे फार
नील नभा छेदुनिया ती
उंच आकाशी उडते घार

चैत्रामधल्या अशा दुपारी
झुळुकीसह ये मोहरगंध
वसंताच्या आगमनाने
कोकीळ गाते होऊन धुंद

अनुक्रमणिकामागीलपुढील
२३. चैत्रामधली भर दुपार | भाव मनीचे उमलत राहो