२७. घारे डोळे

तुझे घारे घारे डोळे
त्यात सारे भाव भोळे
तुझी गोरटी ग छबी
मम हृदयात खेळे

तुझे घारे घारे डोळे
लोभावती मज बाळे
काय सांगू लडिवाळे
मनी रुणझुणती वाळे

तुझे घारे घारे डोळे
जणू कमळाची दळे!
भावभोळ्या दृष्टीतून
स्नेहरस ओघळे

तुझे घारे घारे डोळे
काय सांगू सोनसळे
वात्सल्याने हृदयाचे
तुडुंबते झणी तळे!

२०.१२.१९७८
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
२७. घारे डोळे | भाव मनीचे उमलत राहो