३१. देवाचा घाला

काय सांगू देवा!
तुझी अजब करणी
दुभंगली धरणी
गुजरातेची

एका क्षणात सारे
होत्याचे नव्हते झाले
जन सारे आले
रस्त्यावरती

भरलेले संसार
आणि नांदती घरे
गावे आणि शहरे
जमीनदोस्त

मोठ्यामोठ्या इमारती
भराभर कोसळल्या
भुईसपाट जणू
पत्त्यांचे बंगले

हिऱ्याचा व्यापार
सुरतेचे शहर
दैवाचा कहर
क्षणात हो!

लाखोंचे संसार
मातीमोल झाले
किती जीव गेले
गणती नाही

कुणी कुणाचे इथे
पुसायचे आसू
रागावली वसु
पुत्रावरी

काय झाला गुन्हा
गुजरात बंधूंचा?
घाला हा दैवाचा
अकल्पित हो!

१५.२.२००१
अनुक्रमणिकामागीलपुढील
३१. देवाचा घाला | भाव मनीचे उमलत राहो