३३. आगीन गाडी आली हो!

झुक् झुक् झुक् आवाज करीत, आगीनगाडी आली हो
डब्यामागुनी डबेच दिसती, शान हिची तर न्यारी हो...

रंगित रंगित गाडी छान
त्यात बैसती थोर नि सान
पहावयाला खिडक्या असती गम्मत वाटे भारी हो...

कुक् कुक् कुक् कुक् शीट वाजते
स्टेशनात मग गाडी येते
उतरणे अन् चढण्यासाठी गर्दी होते भारी हो!...

चाय गरम, पाव नरम
इडली, डोसा, वडा गरम्
कॉफीवाला, चायवाला, फळांची तर गाडी हो!...

निशाण हिरवे आता दिसले
शिट्टी ऐकुन सारे चढले
खिडकीमधुनी रुमाल हलती घरेही पळती झाडे हो!...

गाव आमुचा मागे पडला
गाडीने तर वेग घेतला
मामाच्या हो भेटीसाठी आता चालली गाडी हो...

२४.१.१९७९
अनुक्रमणिकामागीलपुढील
३३. आगीन गाडी आली हो! | भाव मनीचे उमलत राहो