३४. फेरीवाला

आला आला फेरीवाला, आला हो फेरीवाला
गम्मत जम्मत वाटे भारी, अवघ्या बालमनाला

पों पों मोटार आवाज करते
कुक् कुक् गाडी शीट वाजते
भो भो कुत्रा, म्याँव म्याँव मांजर, आवाज करीत आला
आला फेरवाला...

लुक् लुक् बाहुली, बघते छान
रंगित गाडी, बैल लहान,
ससा, पांढरा, पोपट हिरवा, माकड टाळीवाला
आला फेरीवाला...

फताडे पाय, वाकडी मान
उंट-जिराफ जोडी छान
वाघ आणखी सिंह बघा रे अस्वल बंदुकवाला
आला फेरीवाला...

यारे यारे सारे यारे
टप्टप् टप्टप् घोडा घ्यारे,
मोर नाचरा, हरीण बघा रे, हत्ती अंबारीवाला
आला फेरीवाला...

१९.२.१९७९
सोमबार
अनुक्रमणिकामागीलपुढील
३४. फेरीवाला | भाव मनीचे उमलत राहो