४३. सांगतो गाथा शूराची
सह्याद्रिच्य शिवनेरीवर
सूर्यतेज ते आज प्रकटले
दिव्यदर्शने मने हरखली
मावळ-खोऱ्यांची...
स्वराज्याचे बांधुन कंकण
गडागडावर निशाण फडके
चिरडुनी टाकी जुलमी सत्ता
शर्थ ही शौर्याची!...
राजदंड जो न्यायनीतीचा
संस्थापक हा लोकशाहीचा
असा विरागी राजा आपुला
शानच देशाची...
शौर्यासह औदार्य विराजे
दिगंत कीर्ती अशीच साजे
कोटी मुखांतुन शब्द उमटती
धन्य जिजाऊची!...
असा शिवाजी किती वर्णावा!
स्मृतिसुमांचा गंध उरावा
शब्दाने ती कशी वदावी
गाथा शूरांची?...
१९७४