४४. चार हुतात्मे
देशासाठी चार वीर ते
फासावर चढले
तयांचे नाव अमर झाले...
स्वातंत्र्याचे युद्ध पेटले
अग्निकुंडच धगधगलेले
आहुतीच ती सर्वस्वाची
मल्लप्पा दिधले...
स्वातंत्र्याचा मंत्र जपोनी
मार्शल लॉचा भंग करोनी
हुसेननी तर जीवन आपुले
कुर्बानच केले...
तीस सालची बारा तारीख
फाशीची हो मुक्रर झाली
किसन सारडा जीवावरती
उदार हो झाले...
सोलापुरची शान राखली
गोऱ्यांची तर अशी जिरवली!
उत्तर देऊन वाण्याचे हो
जगन्नाथ गेले...
सिद्धेश्वरच्या भूमीमध्ये
चार वीर ते ऐसे झाले
भारतभूच्या सेवेसाठी
जीवित धन्य केले....
१२ जानेवारी १९७८
सोलापूर