४७. प्रेमळ बाळा

प्रेमळ बाळा थांबव वाळा
बाळाचा हा अलड चाळा...

चंद्रासम हे वदन कोवळे
नयनामधले भावही भोळे
जिवणीवरचे हास्य मोकळे
त्या हसण्याचा हर्ष आगळा...

पुष्पच कोमल जणु वेलीवर
परम सुखाचा तू तर आगर
मम हृदयीचा सुखांत सागर
हुंकारही तव मधु लडिवाळा...

माय-पित्याचे प्रेम निरंतर
भरून जाई मोदे अंतर
भावी काल तव होवो सुंदर
आनंदाचा तू तर ठेवा...

३०.६.१९७९
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
४७. प्रेमळ बाळा | भाव मनीचे उमलत राहो