४८. साखरेला गोडी थोडी
सावळी ग माझी मैना
चुरगळे झोपेविना
आळविता अंगाईला
झोप बाळा का येईना?
लतिकेच्या फांदीवर
झोपी गेल्या काऊ चिऊ
दुधावर टपलेली
दूर गेली काळी माऊ!
खाऊ खाऊ म्हणताना
बोल येती बोबडे ते
ताता ताता अंतरीची
साद गोड कानी येते
कन्या ठेव परक्याची
परी तिची माया वेडी
या कन्येच्या कौतुकात
साखरेला गोडी थोडी!
मार्च १९६३
सोलापूर