५१. चंद्र नभीचा

बघा बघा बघा ग सयांनो
बाळ हसतो कसा?
मधुर चांदणे बरसत येतो
चंद्र नभीचा जसा!

इवले इवले नयन बदामी
जावळ कुरळे शोभे नामी
ओठ पाकळी, गाल गुलाबी
गुलाबजामुन जसा!

आंघोळीला रडतो, रुसतो
तीट लावता उगाच हसतो
हसताना मग गालावरती
वर्तुळ उमटे कसा!

झोपेसाठी खळखळ करतो
पिंपळ पारावर सळसळतो
खिडकीमधुनी नभाकडे हा
खुणवितो ग कसा!

त्या चंद्राला ठाऊक नाही
घरात माझ्या नवनवलाई
रडणे-हसणे लोभस बाई
तुम्हीही पण हसा!

२८.१.१९८१
अनुक्रमणिकामागीलपुढील
५१. चंद्र नभीचा | भाव मनीचे उमलत राहो