६०. तुझे चांदण्याचे हात
तुझे चांदण्याचे हात
देती मला साथ
सदोदित
तुझे चंदनाचे हात
वाटतो आधार
जीवनाचा
तुझे सौहार्दाचे हात
रचिती सतत
सौख्यराशी
तुझे हात मृदुतर
घालती फुंकर
दुखा:वर
तुझे कळ्यांचेच हात
दिवसाही भास
चांदण्याचा
तुझे प्राजक्ताचे हात
करिती विरक्त
आसक्तीतुन
तुझे स्निग्ध मधु-कर
बरसती सदा
शांतिरस
तुझे कांचनाचे हात
दाविती प्रभात
सोनियाची
तुझ्या तृप्त, करतळी
द्रौपदीची थाळी
वसतसे
तुझे हात परिपूर्ण
दुजे काय वर्ण
निरूपमे?
४.६.१९६७