६१. राग-अनुराग

राग तुम्हावर धरू कसा मी
राग धरू मी कसा?
त्या रागावर अनुरागाचा
सहजे उमटतो ठसा!

राग क्षणाचा वेड्या मनीचा
स्रोत झरावा नित प्रेमाचा
ढगाळलेल्या आभाळातुन
रविकर हसतो जसा!

राग नसावा कुणाकुणावर
लोभअसावा मनी निरंतर
ऊन-पावसामधुन दिसावा
इंद्रधनू

१२.३.२००६ ,शुक्रवार
अनुक्रमणिकामागीलपुढील