६२. नको कुणावर रुसू!
नको कुणावर रुसू मना, तू
नको कुणावर रुसू
त्या रुसण्याने विरून जाईल
जीवनातले हसू!
या रुसण्याचा लाभ न काही
स्वतः हसूनी इतरा हसवी
हसण्याने मग प्रमुदित होईल
दाही दिशांतुन वसू
हसा आणखी सकला हसवा
हसण्यामधुनी खसखस पिकवा
राहिल ना मग जराही रुसवा
उमटे गाली हसू
रुसलेल्यावर कोटी करूया
हसण्याची तर कास धरूया
आनंदाचा मळा फुलवूया
येइल निखळ हसू!
४.८.२००६, शुक्रवार