११. शांत कसे बैसला ?

  आईवडिलांचे छत्र नाहीसे झाले. अशा विकल अवस्थेत बाळ ज्ञानेश्वर माधुकरीसाठी येला असता, एका ब्रह्मवृंदाच्या घरी ज्ञानेश्वराच्या झोळीत माती टाकली व तो मणाला दारोदार भिक्षा मागत हिंडण्यापेक्षा ही मृत्तिकाच भक्षण करा, म्हणजे भूकच लागणार नाही.'

  हे ऐकताच ज्ञानेश्वर तडक झोपडीकडे आले. त्यांनी झोपडीचे दार लावून घेतले. त्यांची मुद्रा लाल झाली होती. अंतर्यामी वणवा पेटला होता. 'मला काहीच कसे करता येत नाही', असा स्वतःलाच प्रश्न केला. क्रोधाची परिसीमा झाली. त्यांनो पद्मासन घातले. डोळे मिटले व ते ध्यानस्थ बसले. त्यांची समाधी लागलो.

  निवृत्ति, सोपान आणि मुक्ताईने ओळखले की ज्ञानदादा चिडला आहे. झोपडीचे दार आतून बंद. मुक्ताईने ज्ञानेश्वराला खूप हाका मारल्या. पण दार उघडले नाही.

  भावाचा रुसवा काढण्यासाठी मुक्ताई म्हणते....

शांत कसे बैसला, ज्ञानिया, शांत कसे बैसला ?
जीविताला विमुख होऊन नाहक का रुसला ? ।। ध्रु. ।।

सागवेळुच्या बनात चाले वाऱ्याचे गीत
त्या गीताचा नाद अनाहत घुमे अंतरात
भावार्थाविण तुझ्या कळेना बोध आम्हा कसला?... ।।१।।

गिरिकंदरा घालून वेढा नदी पुढे धावते
क्षीरसागरी विलीन व्हावे मनोमनी प्रार्थिते
अर्ध्यावरती थांबायचे मान्य नसे तिजला... ।।२।।

लोकजीवनी वादळ उठले वडवानल चेतला
जलधारांसह तू आता यावे घेऊनि पर्जन्याला
तृषार्त जीवा शांत कराया त्राता तू एकला... ।।३।।

घन अंधारी वादळ नौका सैरभैर जाहली
दिशाहीन ही नाव आमुची मध्येच का अडली?
तेजोमय नव प्रकाश दावून नेई किनाऱ्याला... ।।४।।

अनुक्रमणिकामागीलपुढील
११. शांत कसे बैसला ? | गीत ज्ञानदेवायन