१७. ऐक अर्जुना, ऐक पार्था..
दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग सांगितला आहे. सृष्टीरचना, सांख्यशास्त्र, पंच-महाभूतांमध्ये स्थिरता नाही म्हणून, अस्थिर शरीररचना आदी सविस्तरपणे विशद केले आहे.
तिसऱ्या अध्यायात कर्मयोग सांगितला आहे. व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या चांगल्या बाईट गोष्टींचा विचार, देहधर्मापासून केव्हाही मुक्त होता येत नाही. म्हणून टाळण्याऐवजी परिणामाकडे लक्ष देणे. म्हणून पार्थाला भगवंत सांगतात...
ऐक अर्जुना, ऐक पार्था
जड चैतन्या विचार करणे,
ब्रह्मस्वरूपी तन्मय होणे
ज्ञानयोग अन् कर्मयोगही
जाणुन घेई दोन्ही अर्था... ।। ध्रु.।।
पूर्व-पश्चिम नद्या वाहती,
सागरास त्या अंती मिळती
ज्ञानमार्ग हा नव आचरता
कर्मयोग हे साधन हाता
नेईल मोक्षाप्रत तुज पार्था... ।।१।।
उत्पत्ती, स्थिति, लय हे तिन्ही
बंध न सुटती मानवदेही
क्रम सृष्टीचा अवलोकीही
अक्षयच जे ब्रह्मस्वरूपी
पाही सर्वांभूती स्वतः... ।।२।।
कर्म त्यागिता कर्म न उरते,
पर्ण जीर्ण जे व्योमी फिरते
मानवदेहा कर्म न सुटते
मनोंद्रिय व्यापार सर्वही
त्यजिती ना सर्वथा... ।।३।।
युद्ध कराया मला सांगता,
कसे करावे हो भगवंता ?
असल्या हिंसेपायी का
बलिदान अहिंसेचे?... ।।५।।
कथा येथूनि सुरू होतसे
क्षात्रधर्म या क्षत्रियांचा
कर्मयोग हा निष्कामाचा,
निरूपणातुन असा गुंफिती
दास निवृत्तीचे... ।।६।।