१६. श्रावणधारा

आला श्रावण नाचरा
शेला घेऊन हिरवा
धरेसाठी

सरीवर सरी येती
विजा कशा लववती
आभाळात

टपटप पडे मोती
चमकती कशी पाती
गवताची

ओल्या नागपंचमीची
घाई नटण्याची
धरणीला

ऊन-पावसाची जोडी
करीतसे लाडीगोडी
इंद्रधनूशी

असा पडता पाऊस
मना होतसे भास
अज्ञाताचा

येता श्रावणाच्या धारा
तृप्त होई वसुंधरा
मनोमनी

धुंद श्रावण वर्षतो
मत्त मयूर नाचतो
अत्यानंदे!

१९६८
अनुक्रमणिकामागीलपुढील
१६. श्रावणधारा | सृष्टीचे हे रूप आगळे