१७. मृद्गंध

मधु बनात
मकरंद गात
रव कानात
गुंजारतो

वेळुवनात
समीर गात
सुरेल नाद
लगद येतो

गर्द राईत
गंधवारा
आम्रतरू
मोहोरतो

मेघमाला
वर्षधारा
मोरपिसारा
फुलारतो

तृप्त होत
वसुंधरा
गंध तिचा
सुखावतो!

ऑगस्ट १९७५
अनुक्रमणिकामागीलपुढील
१७. मृद्गंध | सृष्टीचे हे रूप आगळे