२१. ब्रह्मकमळ

रात्री बारा वाजता
ब्रह्मकमळ उमलते
आणि गंधाने त्या
सारे आसमंत भुलते

भर बारा वाजता
ब्रह्मकमळ उमलते
धुंद रातराणीला
सुगंधाची सोबत करते

अशा अपरात्री का
ब्रह्मकमळ उमलते?
वेड्या मनात माझ्या
प्रश्नचिन्ह उमटते

मध्यान् राती असे
ब्रह्मकमळ उमलते
कृष्णवेड्या राधेला
मधुगंधाची भेट देते...!

ऑगस्ट १९९८, गोकुळाष्टमी
अनुक्रमणिकामागीलपुढील
२१. ब्रह्मकमळ | सृष्टीचे हे रूप आगळे