२२. तळ्यातलं कमळ
तळ्यातलं कमळ
मनात हसलं,
हसता हसता
स्वतःच फसलं
तळ्यातलं कमळ
भ्रमरा दिसलं,
मध सेवता
भान विसरलं
तळ्यातलं कमळ
मनी मोहोरलं,
भ्रमरासंगे
असं हरवलं
तळ्यातलं कमळ
असलं कसलं?
रवी मावळता
मिटून बसलं...!
सप्टेंबर १९९०
तळ्यातलं कमळ
मनात हसलं,
हसता हसता
स्वतःच फसलं
तळ्यातलं कमळ
भ्रमरा दिसलं,
मध सेवता
भान विसरलं
तळ्यातलं कमळ
मनी मोहोरलं,
भ्रमरासंगे
असं हरवलं
तळ्यातलं कमळ
असलं कसलं?
रवी मावळता
मिटून बसलं...!