२८. रंगी रंगला श्रीरंग

रंग खेळतो रंग श्रीहरी
रंग खेळतो रंग,
अन् राधेच्या अंगावरती
उडवून देतो रंग

रंग खेळती गोपगोपिका
रंग लाविती एकमेका,
हर्ष आणि उल्हासाचे
मनात उठती तरंग

या रंगाची रंगत न्यारी
रंगामध्ये रंगती सारी,
किती वर्णावी रंग माधुरी
गोकुळ पुरते दंग

रंगी रंगे तो श्रीरंग
रंगामध्ये दंग राधिका,
अद्वैताच्या रंगी रमती
राधा अन् श्रीरंग!

३०.३.२००५, बुधवार, रंगपंचमी
अनुक्रमणिकामागीलपुढील
२८. रंगी रंगला श्रीरंग | सृष्टीचे हे रूप आगळे