३. पहाटवेळी
काय सांगू रे माणसा
पहाटेचा समय कसा?
उल्हासाने परमेश्वर
उरी नांदतो जसा!
पहाटवेळी कानी येती
भक्तीच्या लहरी,
जैशी कृष्णाची पावरी!
पहाटवेळी ऐकू येते
पक्ष्यांची किलबिल,
भासतो परिसर हा सुंदर!
पहाटवेळी मंदिरातुनी
टाळांची किणकिण,
भक्तीने भरून येई मन!
पहाटवेळी वाऱ्यावरती
सुमनांचा गंध,
होते आसमंत धुंद!
पहाटवेळी ऐकू येतो
नामाचा गजर,
होते पावन हे अंतर!
पहाटवेळी ऐकू येती
गीतेचे बोल,
कळते जीवन हे अनमोल!