३०. श्यामल संध्या

नील नभावर
सरसर उतरे
श्यामल संध्या

संध्यासमयी
अवकाशाची
सरे निळाई

पश्चिमगामी
खगही उडती
अलगद व्योमी

अस्ताचली ये
अवनीवरती
धूसर दुलई

श्यामल वेळी
कृष्णधनावर
रुसली राधा

अनिकेतापरी
एक अनावर
जडली बाधा

१९७५
अनुक्रमणिकामागीलपुढील
३०. श्यामल संध्या | सृष्टीचे हे रूप आगळे