३३. रंगांची उधळण
आज पश्चिमा घेऊन आली
रंगाची ओंजळ
मावळतीला आज होतसे रंगाची उधळण...!
फिकट-तांबडा रंग जरासा
त्यातून प्रकटे निळा कवडसा
रंग केशरी हवाहवासा
खुलतसे मावळते अंगण
मावळतीचा रंगच न्यारा
पवित्र-मंगल परिसर सारा
सात्त्विकतेने भरून गेला
मम हृदयीचा गाभारा
सांजसमयीचा रंग आगळा
फिका-जांभळा, जरा सावळा
रोमरोमी या भरून उरतो
त्या राधेचा श्याम सावळा...
२५.६.२०००, सोमवार, संध्यासमयी ६ वाजता