४०. श्यामसुंदरा

श्यामसुंदरा येई मंदिरा, येई मंदिरा रे
तव नामाची कीर्त ऐकुनी आलो द्वारा रे!

आयुष्याच्या मार्गावरती
बहुपापांच्या रचिल्या राशी
अंती आलो चरणापाशी
देई आसरा रे!

डळमळ करिते जीवननौका
ऐक जिवाच्या आर्त हाका
विघ्नविनाशा हे ऋषिकेशा
नेई पैलतिरा रे!

हाक मारूनी थकलो आता
तुझ्यावाचुनी नाही त्राता
तू सकलांचा जीवनदाता
भवभय हारी रे रे!

जुलै २००२
अनुक्रमणिकामागीलपुढील
४०. श्यामसुंदरा | सृष्टीचे हे रूप आगळे