४२. मन विठ्ठल विठ्ठल बोलले
मन विठ्ठल विठ्ठल हे बोलले
मन आनंदी आनंद आनंदले!
रूप सावळे साठवू डोळा किती?
गुण अद्भुत आठवू वेळा किती?
भावभक्तीच्या रसात मन दंगले
तुझ्या भक्तीच्या मस्तीत राहू किती?
तुझ्या प्रेमात दंग मी होऊ किती?
समचरणी सर्वस्व मी वाहिले
तुझ्या अगाध लीला मी वर्णु किती!
लीला पाहून कुंठित होई मती
मधु मुरलीच्या स्वरात मन रंगले
प्रेमे विठ्ठल विठ्ठल बोलू किती?
तुझ्या नामाचा महिमा मी गाऊ किती?
रूप साक्षात भगवंत मी देखिले...
१३.१.१९९८,
पंढरपूर