५८. कोणापासून काय शिकावे ?
फूल शिकविते हसत राहावे,
कुणा न भ्यावे डुलत रहावे...
मेघ स्वतःला झोकून देतो,
आणि बरसतो धरणीवरती...
दूध नि पाणी मिसळून जाते,
आणि शिकविते समरसता...
शीतल वारे गंध पसरते,
सुखवित वदते यारे सारे...
जीवनसरिता वाहत वदते,
कधी न थांबणे कालप्रवाही...
वृक्षलता त्या फळभारासह,
देत साऊली नम्र होऊनी...
नील नभासम विशाल आणिक
स्वच्छ असावे, अंतरंगही...
अनंत ऐसा अथांग दर्या,
थांग नसावा औदार्याला...
निर्भय निर्मल आवडणारे,
व्हा सकलांचे नयनांचे तारे...
६.६.१९८१