५९. लेण्याद्रीच्या गिरिजात्मका

हिमगौरीच्या गिरिजात्मका
मंगलमूर्ती नमू मोरया,
लेण्याद्रीला वसे लीलया
सुखकर्ता तू श्रीगणराया

सह्यगिरीच्या अज्ञ ठिकाणी
प्राणिमात्रही नव्हते कोणी,
चिरशांतीच्या दुर्गम ठायी
तप आचरिते गिरीजामाई

दक्षिणेस जे आसन असुनी
पूर्व दिशा तव नेत्र न्याहळी,
सिंधुरचर्चित मूर्ती धवळी
तुला निर्मिते गिरिजा भोळी

तूच स्वयंभू वरदविनायक
तू सकलांचा विघ्नविनाशक,
गिरिजात्मक तू करुणाकारक
तू जगताचा होशी पावक

लेण्याद्रीच्या श्रीस भजावे
तुझिया चरणी लीन रहावे,
भावभक्तीने नित्य स्मरावे
तुझ्या दर्शन कृतार्थ व्हावे...।

जानेवारी १९९०
अनुक्रमणिकामागीलपुढील
५९. लेण्याद्रीच्या गिरिजात्मका | सृष्टीचे हे रूप आगळे