६२. कर्मयोग

गीतेमधला कर्मयोग हा
जाणुन घे माणसा

करावी कर्माची साधना...

आशेच्या विरहित कर्म हे
करित राहा निष्काम कर्म हे,
जाणुन घे असीमित मर्म हे

रुजावी एक नवी भावना...

आशा-निराशा हिंदोळ्यावर
हेलावत मन या द्वंद्वावर
स्वैर मनाला घालित आवर

फुलावी कर्माची प्रेरणा...

त्रिगुणातीत हे कर्मच ऐसे
हेतुविरहित मनात विलसे,
पूर्ण जीवना व्यापून वैसे

करावी नित्य मनी प्रार्थना...

ज्ञानासंगे जोड भक्तीची
ज्ञानकर्मासवे तिहींची,
मर्त्य जीवाला ओढ शिवाची-रहावी,

रहावी,अंतिम ही कामना...

८.६.२००२
अनुक्रमणिकामागीलपुढील
६२. कर्मयोग | सृष्टीचे हे रूप आगळे