६३. समजुन घे माणसा

सत्त्व-रज-तम गुणत्रय हे
समजुन घे माणसा,
मनावर या त्रींचा ठसा...

उत्पत्ती-स्थिति-लय हे वाचे
ब्रह्मा-विष्णू-महेश साचे,
मनुज खेळणे तू दैवाचे
त्या शरण जाय तू कसा !

परमेशाची अजब रीती
ब्रह्मयाची तर तू उत्पत्ती,
उत्पत्तीतून रुदन तुझे रे
सुखदुःखे वारसा..

श्रीविष्णूचे तुज संगोपन
निशिदिनी जीवांचे संरक्षण,
विश्वात्म्याचे प्रेम जाणुनी
कृतज्ञ हो माणसा !

ब्रह्मा-विष्णू तुजला तारण
महेशाचा कोपही दारुण,
होय त्रींचे जर विस्मरण
अंती अंतच रे माणसा...!

१०.६.२०००
सोलापूर
अनुक्रमणिकामागीलपुढील
६३. समजुन घे माणसा | सृष्टीचे हे रूप आगळे