७. पाखराचे गोड गाणे

माझ्या ग अंगणात
येतो पाखरांचा थवा,
दाणे टिपता टिपता
दिस उगवतो नवा

दुरून न्याहाळतो
हिरवाकंच तो रावा
उंचावरून झेपावतो
निळासावळा पारवा

चिमण्या नि साळुंक्या
दाणे टिपती अलगद
पाखरांची किलबिल
मना देतसे आनंद

दिस असा उगवतो
मंजुळ आवाजाने
रोज रोज ऐकू यावे
पाखराचे गोड गाणे

१.४.२००५, शुक्रवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
७. पाखराचे गोड गाणे | सृष्टीचे हे रूप आगळे