७३. मुक्त राधिका या संसारी

तव मुरलीच्या नादाचे हे वेड जिवा लागले
मुकुंदा तुझीच मी झाले...

मी तर गवळण भोळी राधा
मजवर झाली कसली बाधा?
काही सुचेना काम न धंदा
चित्त राहिना थाऱ्यावरती, उडून ते गेले...

सूर मुरलीचा कानी पडता
प्रमाद घडतिल अगणित आता,
बोल लावतिल येता-जाता
मधु पावरी करी बावरी, सैरभैर झाले...

आवर आता मोहन-मुरली
संसाराची माया सरली,
मुक्त राधिका या संसारी
पैलतिराला पार कराया आतुर मी झाले...

२७.७.१९८३
अनुक्रमणिकामागीलपुढील
७३. मुक्त राधिका या संसारी | सृष्टीचे हे रूप आगळे