७४. पुन्हा एकदा
पुन्हा एकदा यमुनातीरी
ऐकव ती पावरी,
होऊ दे राधेला बावरी
पुन्हा एकदा कुंजवनामधी
घुमव तुझा पावा,
अन् राधेचा पुनर्जन्म व्हावा
पुन्हा एकदा शरद्-रातीला
गोपीसह ये हरी,
रंगू दे रासक्रीडा न्यारी
पुन्हा एकदा दाह्यादुधाची
फिरून करी चोरी,
हरी तू ये रे नंदाघरी
पुन्हा पुन्हा मी अशा जगी या
शोधित फिरतो तुला,
हरी रे भेटशील केव्हा मला?
२४.४.१९९४