७७. श्रीरामा रे करुणाकरा

श्रीरामा रे करुणाकर तू,
रात्रंदिन मी तुला स्मरावे
मनात माझ्या भावभक्तीचे बीज अंकुरावे...

भवकंटकी वाट येथली
प्रलोभनांची पेठ थाटली,
तृष्णा इथली सदैव नटली
तुझ्या कृपेने या लोभातून पारच मी व्हावे...

कुसंगतीतून दूर राहावे
भयापासून रक्षण व्हावे,
पापामधुनी मुक्त करावे,
क्षमा करूनी या भक्ताला अभय तुम्ही द्यावे...

यत्किंचितही द्वेष नसावा
अहंपणा तो विरून जावा,
सहिष्णुतेचा ध्यास घरावा
निर्मलबुद्धी देऊनिया मज उपकृत करावे...

पदकमली मी लीन असावे
आसक्तीला त्वरे त्यजावे,
भवपाशातून मुक्त करावे
आणि सदोदित समचरणावर माझे चित्त रमावे...

२५.५.२००४, मंगळवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
७७. श्रीरामा रे करुणाकरा | सृष्टीचे हे रूप आगळे