८०. पैलतीर

मावळतीच्या रविकरा रे नमन तुला अंती
नेत्र हे पैलतीरा लागती...

मोहबंधने लयास जाता
पाश सर्व ते फोल भासती,
खुळ्या मनाची फिटली भ्रांती
जिवा वाटले या जगातील सरली हो नाती...

संसाराचा सारीपाट हा
खेळून दमला जीव खुळा हा
या जीवाला हवा विसावा
मना वाटते चिरशांतीचे स्थानच ते अंती...

आवर आता सर्व पसारा
नकोच जीवा इथला कारा,
सोडि रे हा सोनपिंजरा,
पिंजऱ्यातला पक्षी अंती मुक्त होय दिगंती...

१४.७.२००४, बुधवार
अनुक्रमणिकामागीलपुढील
८०. पैलतीर | सृष्टीचे हे रूप आगळे